बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिंमत असेल तर राजीनामा आणि मैदानात या”, अमित शहांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

पुणे | केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भूमिपुजन केलं आहे. त्यानंतर युथ मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीवर आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

पुणे ही लोकमान्य टिळक यांची भूमी आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती. मात्र, आता सत्ता माझा हक्क आहे आणि तो मी कोणत्याही प्रकारे मिळवणारच असं शिवसेना म्हणत आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असंही अमित शहा म्हणाले आहेत. तिघांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढा. भाजप कार्यकर्ते तयार आहेत. महाराष्ट्राची जनताही हिशोब करायला बसली आहे, असंही अमित शहा म्हणाले आहेत.

दरम्यान, हे तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार आहे. या सरकारची तिन्ही चाकं पंक्चर झाली आहेत. ही रिक्षा फक्त धूर सोडले आणि प्रदूषण करते. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“गुलाबराव पाटलांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, रुपाली चाकणकरांचा थेट इशारा

‘वय वाढलं पण त्यांची बुद्धी…’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

केरळमध्ये तणावाचं वातावरण! ‘त्या’ गंभीर घटनेमुळे कलम 144 लागू

“गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?”

“सगळे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसतील तर राजीनामा देईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More