Top News देश

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Photo- Vijay Shinare

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणाची मध्य प्रदेश सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

मध्यप्रदेशात अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान छत्रपतींचा पुतळा ज्या पद्धतीने हटवला त्याबद्दल शिवप्रेमींमध्ये रोष आहे. काँग्रेस नेते राजीव सातव, मंत्री सुनील केदार यांनी तातडीने हा विषय मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यापर्यंत पोहोचवला. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता निर्माण झालेला वाद शमण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रातून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या.

दरम्यान, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या एका शहरात वाहतुकीस अडथळा ठरतो या कारणाने शिवरायांचा अर्धपुतळा असलेला चौथरा हटवण्यात आला आहे. यावरुन भाजपने राज्यातील शिवसेना-काँग्रेसवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत”

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने उदयनराजे आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणं वेबसाईटवर टाका- सर्वोच्च न्यायालय

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटलांची फेरनिवड

विजय देवरकोंडा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या