बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज

मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी कालीचरण महाराजने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कालीचरण महाराज चर्चेत आहेत. त्यातच आता कालीचरण महाराजने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलं आहे. धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेऊन हिंसक व्हायला हवे, असं म्हटलं आहे.

राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला आहे. आपण राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलल पाहिजे, असं कालीचरण महाराजने म्हटलं आहे. राष्ट्ररक्षणासाठी आपण हिंसक व्हायला हवे. ज्याप्रमाणे आपली सेना आहे त्याशिवाय उपाय नाही, असंही कालीचरण महाराज म्हणाला आहे.

शिवाजी महाराजांचा अजेंडा हा मराठी साम्राज्य स्थापनेचा नसून हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यासाठी धर्मध्वज हातात घेऊ त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये प्रांतवाद, भाषावाद राहणार नाही, असं कालीचरण महाराजने म्हटलं आहे.

दरम्यान, कालीचरण महाराजने यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या भाषावादामुळे हिंदूची मते दुखावली आहेत. आपण ज्यावेळस मराठीची गोष्ट करतो त्यावेळेस अनेक भाषा इथे आहेत. हे सगळे हिंदू आहेत, असं कालीचरण महाराजने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी ! रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना…’; संजय राऊतांचा इशारा

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More