पुणे | मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून मनापासून माझे काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक उत्साहाने कामाला लागला आहे. आमदार महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे, असं शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत खासदार आढळराव पाटील बोलत होते.
शिवसेना नाराज असल्याचे विनाकारण पसरवले जात आहे. कोणीही नाराज नाही सर्वजण उत्साहाने काम करत आहेत. महायुतीत पुणे जिल्ह्यात सर्वात आधी समन्वय आणि मनोमिलन भोसरीतच झाले आहे. प्रत्येक शिवसैनिक समन्वयाची बैठक होण्याआधीच कामाला लागला आहे, असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी होतील तसा निर्धार शिवसैनिकांनी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना वाकून नमस्कार; राजेंनी दिलं अलिंगन https://t.co/nctMXmG8dU @AUThackeray
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात कोर्टाचं अटक वॉरंट https://t.co/S0ilWLJdYr @amisha34
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
आदित्य नको तुम्हीच मुख्यमंत्री व्हा!; आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला https://t.co/4JaZutP7lL @AUThackeray @uddhavthackeray @ShivSena @RamdasAthawale #assemblyelection2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
Comments are closed.