पुणे | लोकसभा निवडणूक विकासावर झालीच नाही. राष्ट्रवादीने प्रचारात माझ्यावर अनेक खोटे आरोप केले. त्यांच्या कपटनीतीला मी बळी पडलो, असं वक्तव्य शिरूर लोकसभेतून पराभूत झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं आहे.
शिरूरमधून पराभूत झाल्यानंतर त्यांनी प्रथमच शिरूरच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राजकारणात अन् युद्धात कपटनीती चालतेच आणि त्यांच्या याच कपटनीतीच मी बळी पडलो, असं ते म्हणाले.
जातीचं समीकरण आणि संभाजी महाराजांची मालिका यांचा मला फटका बसला, असं आढळराव पाटील म्हणाले.
दरम्यान, मला मंत्रिपदाची खंत वाटते. जर मला मंत्रिपद मिळालं असतं तर एमआयडीसीत नवीन कंपन्या आणता आल्या असत्या. शिरूर आंबेगावमध्ये विकासाची गंगा आणण्याचं स्वप्न होतं ते राहून गेलं, अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
-आमच्या धंद्यातही टेन्शन वाढलं; 244 आमदारांना बीपी अन् शुगर!- गुलाबराव पाटील
-“उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकंही भोळं समजू नका…”
-पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच; धनंजय मुंडेंचा विश्वास
-…तेव्हा मंत्रिपदाबाबत माझा नक्की विचार होईल- एकनाथ खडसे
-मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!
Comments are closed.