बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला अन् आता शिवसेनेवरच बोलतोय”

पुणे | पुणे-नाशिक महामार्गावरील खेडच्या बाह्यवळण रस्त्याच्या उद्घाटनावरून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या चांगलंच रण पेटल्याचं चित्र पाहायला मिळालं. अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यातच आता नव्या मुद्द्याने हा वाद आणखी पेटला.

अमोल कोल्हे खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन करणार असल्याचं नियोजन करण्यात आलं होतं. खासदार अमोल कोल्हे यांच्या नियोजित उद्घाटनापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संबंधित रस्त्याचे उद्घाटन करून तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं.

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज माध्यमांशी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी स्वतःची औकात पाहून बोलावं, असं म्हणत हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय, असा घणाघात केला.

‘मी म्हातारा झालो असेल तरीही माझ्याकडे बुद्धिमत्ता आणि समजा हे यांच्यासारख्या नटसम्राट सारखा नाही’, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना कोपरखळी मारली आहे.  तसेच सत्ताधारी पक्षातील दोन्ही नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपात टीका करत असताना याचा राज्य सरकारवर नेमका काय परिणाम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More