अमोल कोल्हेंचा मोठा डाव म्हणत शिवाजी आढळरावांची माघार, यापुढे कोल्हेंना उत्तर देणार नाही!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivajirao Adhalrao Patil | शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. दोघेही एकमेकांना वेगवेगळे चॅलेन्ज देताना दिसत आहे.

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांना थेट चॅलेंज दिलं होतं. ते आव्हान आढळरावांनीही स्वीकारलं होतं. मात्र, आता त्यांनी माघार घेतली आहे. मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

वाद नेमका कुठून सुरू झाला?

अमोल कोल्हे यांनी “काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भलं होतंय हे कळतंय”, असा आरोप आपल्या ओतूर येथील भाषणात आढळरावांवर केला होता. काहींनी पंधरा वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे, ते दिसून येतंय, अशी टीका अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली होती.

कोल्हे यांच्या आरोपांनंतर आढळराव पाटील चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कोल्हे यांना थेट प्रतिआव्हानच दिलं होतं. गेली तीन महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप करू लागलेत, असं आढळराव पाटील म्हणाले होते.

इतकंच नाही तर, माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हे यांनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेतो. अन्यथा कोल्हे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं, असं आव्हान आढळरावांनी (Shivajirao Adhalrao Patil ) अमोल कोल्हे  यांना दिलं होतं.पुढे आढळरावांनी दिलेलं आव्हान अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं . “ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही,” असं म्हणत डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारलं.

आढळराव पाटील यांची माघार

आता आढळराव पाटील सपशेल माघार घेतली आहे. ‘मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात.’, असं म्हणत शिवाजी आढळरावांनी (Shivajirao Adhalrao Patil ) मी यापुढं कोल्हेंना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

News Title – Shivajirao Adhalrao Patil reply to Amol Kolhe

महत्त्वाच्या बातम्या –

“दादा तुमच्यात धाडस असेल तर..”, रोहित पवारांचं अजित पवारांना थेट आव्हान

उन्हाळ्यात लहान बाळांना घामोळ्याचा त्रास होतोय?; ‘हे’ उपाय करून बघा

“मोदींनी फोन लावला आणि युक्रेनचं युद्ध थांबलं, हे येड्या गबाळ्याचं काम नाही”

सूरत, इंदौरनंतर ‘या’ मतदारसंघात चक्र फिरली!

“कोल्हापूरमध्ये मर्दांची कमी आहे काय?, कशाला हवं टेस्ट ट्यूब बेबी?”