पुणे | विजयाचा चौकार मारणार म्हणजे मारणार, असं म्हणत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं आहे. ते शिक्रापूर येथे बोलत होते.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिक्रापूर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचारसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे.
शिरुरकरांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी 100 टक्के विजयी होणार आहे, असं आढळराव म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
-“ओपनींग बॅटसमन म्हणून खेळायला आलेले पवार मोदींना पाहून मैदानाबाहेर पळाले”
-उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध न्यायालयाचं वाॅरंट
-प्रियांका गांधींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत निर्णय झालाय- राहुल गांधी
–ईव्हीएममधून फक्त भाजपलाच मत- अखिलेश यादव
–मुख्यमंत्री व्हायला नक्कीच आवडेल – अजित पवार
Comments are closed.