विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन

मुंबई | विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवाजीराव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी विधान परिषदेचं सभापतीपदही भूषवलं होतं. 

1 सप्टेंबर 1935 मध्ये शिवाजीरावांचा जन्म झाला होता. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली! 

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

Google+ Linkedin