Top News महाराष्ट्र मुंबई

‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका

मुंबई | केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये गेल्या 72 दिवासांपासू शेतकरी आंदोलन चालू आहे. अशातच या आंदोलनाना परदेशी पॉपस्टार रिहानाने पाठींबा दिल्यानंतर भारतातील बड्या हस्तींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. यामध्ये भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर सचिनवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

दोन परदेशींनी आंदोलनाला पाठींबा दिल्यानंतर त्याने या वादात उडी घेतली. यावरून राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील माजी खासदार शिवानंद तिवारींनी त्याच्यावर टीका केली आहे.

तेंडुलकर भारतातील अनेक उत्पादकांचा ब्रँडअम्बेसेडर आहे त्यामुळे तो भारतरत्नसाठी पात्र नाही त्यापेक्षा मेजर ध्यानचंद यांच्यासारखे अनेकजण भारतरत्नसाठी पात्र असल्याचं शिवानंद तिवारी म्हणाले. यावरून जदयूचे प्रवक्ते निखील मंडल तिवारींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, जर सचिन तेंडुलकर पात्र नाही मग भारतरत्नसाठी कोण पात्र आहे? असा सवाल करत  निखील मंडल यांनी तिवारींवर टीका केली असून यांना काय बोलावं हे कळत नाहीये. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचंही मंडल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”

‘अक्षयने लग्नाचं वचन देत माझा वापर केला आणि …’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप

महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान

सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?- देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या