देश

“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे नेते शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला होता, तेव्हा आपण विरोध केला होता, असं शिवानंद तिवारी यांनी सांगितलं आहे.

सचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होतं. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही. हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे, असंही शिवानंद तिवारी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण!

‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या