ठाकरेंनी बड्या नेत्याची उमेदवारी नाकारली!

Vidhansabha 2024

Vidhansabha 2024 l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी उमेदवारी मिळवण्यासाठी झटपट करत आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवडी येथील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं दिसून येत आहे.

शिवडीचा उमेदवार जाहीर :

शिवडी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं आहे. तसेच शिवडी मतदारसंघाचा वाद हा उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर देखील गेला होता. मात्र आता विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवडी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. मात्र त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्या संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मात्र त्या बैठीनंतरच आज उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना जाहीर केली आहे.

Vidhansabha 2024 l अखेर आज तिढा सुटला :

शिवडी विधानसभेबाबत तिढा अनेक दिवसांपासून सुटत नव्हता. मात्र आज विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करून हा तिढा अखेर सुटला आहे. याशिवाय आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये शिवडीची जागा मिळवण्यासाठी ओढाताण सुरू होती.

मात्र आज शिवडी विधानसभेचे शाखाप्रमुख ठाकरेंच्या मातोश्रीवर आले होते आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधून शिवडी विधानसभेचा उमेदवार आज जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

News Title : Shivdi Vidhansabha 2024

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; काय आहे प्रकरण

आज ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट्स समोर

निवडणुकीतच गेम करणार.., मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी; राजकारणात खळबळ

महाविकास आघाडीने आखला मोठा प्लॅन! सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .