महाराष्ट्र मुंबई

… म्हणूनच भाजपचा हा सगळा डाव आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरुन शिवसेनेनं सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित या नव्या झगड्यामागे आहे, असं आरोप शिवसेनेनं केला आहे.

2014 सारखं यश भाजपला मिळत नाही. किमान शंभर जागा उत्तरेपासून महाराष्ट्रापर्यंत कमी पडतील. त्याची भरपाई करण्यासाठी भाजप पश्चिम बंगालकडे आशेनं पाहत आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

2019 चं गणित जूळवण्यासाठी हा सगळा झगडा आहे. यासाठी कोणत्याही थराला जावे, असा हा सगळा डाव आहे, असंही त्यात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं सीबीआयवरही टीका केली असून दिल्लीत ज्यांची सत्ता त्यांच्या मनगटावर बसलेलं पोपट, अशी या संस्थांची अवस्था आहे, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद; चार युवक जिल्हाध्यक्षांचे राजीनामे

-जीव गेला तरी चालेल, पण तडजोड करणार नाही- ममता बॅनर्जी

निधी आणल्याच्या थापा कशाला मारता?; पंकजा मुंडेंकडून विरोधकांचा समाचार

प्रियांका गांधी पुढच्या तैमूर अली खान- पुनम महाजन

नितीन गडकरींच्या उत्तरांनतर राहुल गांधींचा आणखी एक सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या