बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल’; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

सातारा | आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.

आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही भूमिका मांडली.

इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; रूग्णालयातून सोडलं घरी

अकरावी प्रवेश प्रकरणी राज ठाकरे यांचा वर्षा गायकवाड यांना फोन

“या जगात 2 व्यक्तींना शोधणं अशक्य, पहिला मोदींचा क्लासमेट अन् दुसरा…”

गरज भासली तर भाजपला देखील पाठिंबा देऊ; मायावती यांचं मोठ विधान

कोचिंग क्लासेस सुरु करा; क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची घेणार भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More