Top News

पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजे म्हणतात…

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मरगळ आली आहे. सत्तेपासून दूर राहता येत नाही. आरक्षणाच्या निर्णयामुळे तरूण मराठा समाज भाजपसोबत आहे, असं स्पष्टीकरण देत साताऱ्याच्या जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

शिवेंद्रराजे भोसले यांंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजेंशी असलेल्या वादामुळे शिवेंद्रराजे चांगलेच चर्चेत असायचे. मात्र पक्ष सोडताना त्यांनी माझ्यात आणि उदयनराजे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. उदयनराजे हे मोठे बंधू आहेत. ते भविष्यात कायम माझ्यासोबत असतील, असं म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: शिवेंद्रराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतू पवारांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

महत्वाच्या बातम्या-

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

-काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

-‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

-पुलवामा हल्ल्याच्यावेळी मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या