बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दहा मिनीटं रडायचं आणि जाताना पप्प्या घ्यायच्या, हे नेहमीचंच झालंय “

सातारा | खासदार उदयनराजे भोसले (MP Udyanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. एकाच पक्षात असूनही दोन्ही नेते कायम एकमेकांवर आरोप करताना दिसतात. त्यातचं आता नगरपालिका निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा हा संघर्ष वाढताना दिसत आहे. शुक्रवारीचं उदयनराजे भोसले यांनी एका सभेत गाणं म्हणत शिवेंद्रराजेंना टोला लगावला होता. आता शिवेंद्राराजेंनी या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सातारा नगरपालिकेच्या इमारतीच्या भुमीपूजनाच्या प्रसंगी उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना गाणे म्हणत टोला लगावला होता. उदयनराजेंनी यावेळी “काय बाई सांगू? कसं ग सांगू ? मलाच माझी वाटे लाज. काहीतरी होऊन गेलयं आज,” असं गाण म्हटलं होतं, उदयनराजेंनी लगावलेल्या टोल्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.

उद्यनराजेंच्या टोल्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भूमीपजन झालेल्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेट नाही, तांत्रिक मान्यता नाही, असं असताना लोकं नारळ फोडून, कसं बाई सांगू वगैरे गाण लावण्यापेक्षा नेमकी तुम्हाला लाज कशाची वाटते? हे सातारकरांना कळू दे. नेहमीच्या ट्रिक्स झाल्यात या. दहा मिनिटं रडायचं आणि जाताना पप्पी घ्यायच्या, नेहमीचं झालं आहे हे, असं जोरदार प्रतिहल्ला शिवेंद्रराजेंनी केला आहे.

दरम्यान, उदयनराजेंनी शुक्रवारी कार्यक्रमात शिवेंद्रराजेनां चर्चेला येण्याचं आव्हान दिलं होतं. चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे केव्हाही तयार आहेत. मात्र चर्चेला येण्यासाठी त्यांच्यात धाडस पाहीजे, अस म्हणत उदयन राजेंनी शिवेंद्रराजेंना आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवेंद्रराजेंनीही उदयराजेंवर चागंलाच  प्रतिहल्ला केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय”

‘एसटी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’ अजित पवारांचा कर्मचाऱ्यांना इशारा

‘गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

‘राज्यात तिसरी लाट आलीच तर ती Omicronची असेल’; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

‘दोन बायका फजिती ऐका! ‘या’ पठ्ठ्यानं दोन्ही बायकांना निवडणुकीत आणलं निवडूण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More