SHIVENDRARAJE - ना डीजे ना उदयनराजे; साताऱ्यात फक्त शिवेंद्रराजे...
- Top News

ना डीजे ना उदयनराजे; साताऱ्यात फक्त शिवेंद्रराजे…

सातारा | गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे दिसले ना त्यांचा डीजे मात्र या विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रराजेंनी ढोल ताश्याच्या गजरात ठेका धरला होता. त्यामुळे साताऱ्यात शिवेंद्रराजेंचीच चर्चा होती.

मंगळवार तळे माझ्या मालकीचे आहे. वाटेल त्या परिस्थितीत मूर्ती विसर्जन तेथेच होणार, साताऱ्यात डि.जे. वाजणारच असा इशारा खासदार उदयनराजेंनी दिला होता. मात्र ते पुण्यात आले होते. रात्री उशिरा पर्यत ते साताऱ्यात दाखल झालेच नाहीत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम तळे खोदले तर दूसरीकडे पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात डि.जे. यंत्रणा जप्त करण्याचा धडाकाच लावला. परिणामी रविवारीची गणेश विसर्जन मिरवणुकी शांततेत पार पडली. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर मे करेंगे…

-20 वर्षे भाजपची सेवा केल्याचं हे फळ मिळालं; भाजपच्या जेष्ठ नेत्याची खदखद

-लठ्ठपणामुळेही होऊ शकतो कॅन्सर; महिलांना सर्वाधिक धोका

-गोव्यात नाराजीची ठिणगी; मनोहर पर्रीकरांचा वरिष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळातून डच्चू

-‘न्यूड सीन’बद्दल पहिल्यांदा मला आईकडून समजलं- राधिका आपटे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा