सातारा | लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजेंचं वागणं बदललं आहे. ते माझ्या मतदारसंघात कुरघोडया करत आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींना मी कळवलं आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं आहे.
उदयनराजेंच्या वागणुकीचा पाढा मी पक्षश्रेष्ठींकडे वाचला आहे. आता यावर तेच निर्णय घेतील, असं म्हणत त्यांनी पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे.
आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला होता तो शब्द आम्ही पाळला. आता त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळावा. त्यांच्या कुरघोडया काय आम्हाला नवीन नाहीत, असं शिवेंद्रराजे म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत कुरबुरी बाहेर यायला सुरूवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-विखे नव्हे विरोधी पक्षनेता मंत्री बनण्याची सुरुवात शरद पवारांपासून!
-एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीतून घेतली शपथ
-अजित पवारांचा मिश्किल अंदाज; म्हणाले आमचा तिसरा विरोधी पक्षनेता तरी पळवू नका
-शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडूंच शोले स्टाईल आंदोलन; चढले साखर संकुलावर
Comments are closed.