महाराष्ट्र मुंबई

जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार- शिवेंद्रराजे भोसले

Loading...

सातारा | आम्ही मुलगी दिली त्यामुळे सगळे जावई मोठे झालेत असं रामराजे म्हणतात. त्यामुळे रामराजेंनी लक्ष ठेवलं पाहिजे. जावयी अडचणीत आला तर मुलीला देखील त्रास होणार आहे, असा  टोला साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला आहे.

जावळीच्या विकासकामांमध्ये कधीच राजकारण येणार नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील कधीही राजकारण आणणार नाहीत, असं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. ते जावळीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

Loading...

जिल्ह्यात अलिकडच्या काळात खुनशी राजकारण वाढू लागलं आहे. राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष नाही. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार भल्याभल्यांना समजणार नाहीत. असं रामराजे यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, माझ्याकडे पालकमंत्रिपद आहे त्यामुळे पालक म्हणून जिल्ह्यात डावं, उजवं करता येणार नाही. त्यामुळे बाबाराजे आपण काळजी करू नका. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

भाजप ‘आप’ला ट्रोल करायला गेलं अन् स्वत:च ट्रोल झालं! –

कंगणा चिडली; घेतला सैफ अली खानसोबत पंगा!

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या