Top News

समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यात चाललेले संप, आंदोलन लोकांमध्ये सरकारविरोधात असलेला असंतोष या पार्श्वभूमीवरही भाजप सगळ्या निवडणुका जिंकतं कसं?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून सरकारच्या लोकप्रियतेवर आणि विजयावर शिवसेनेनं बोट ठेवलं आहे.  

मराठा समाज आरक्षणासाठी, शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी तर सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयोगासाठी संपावर जात आहेत. समाजात प्रचंड असंतोष असतानाही भाजप विजयी होतो कसा?, असा सवाल शिवसनेने केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण लोकप्रिय असल्याचा दावा करतात. तर दुसरीकडे त्यांना सत्तेवर आणणारे उद्रेक करतात. मग हेच सरकारच्या लोकप्रियतेचे लक्षण का? सरकार खरंच लोकप्रिय आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण

-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं

-राज्यात पेटलेल्या मराठा वणव्यास सरकारच जबाबदार- विखे-पाटील

-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद

-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या