बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

मुंबई | बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘बिग बाॅस मराठी 3’ हा मराठमोळा शो आठवड्याभरापासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर याचाच बोलबाला पहायला मिळत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर वाद-विवाद, चर्चा होणारचं. अशातच या वादग्रस्त शोमधून शिवलीला पाटीलची एक्झीट झाली आहे.

शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. त्यामुळे बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे काही दिवस व्होटिंग लाईन्स बंद राहणार आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ती पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात दिसणार आहे.

शिवलीला प्रसिद्ध कीर्तनकार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. कीर्तन करण्याची त्यांची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असलेल्या पहायला मिळतात.

दरम्यान, शिवलीला बाहेर जाणार म्हटल्यावर अनेकांचा चेहरा आता उतरला आहे. आता पुन्हा कधी त्यांचं पुनरागमन होईल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हि़डीओ-

थोडक्यात बातम्या – 

“उगाच मला डिवचू नका, मी केंद्रातलं सरकार पाडलंय”

आंदोलन भोवलं! काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

“आता जनतेच्या न्यायालयातच ‘या’ भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल”

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; ‘या’ 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी

देसी जुगाड! बैल आणि ट्रॅक्टरशिवाय पठ्ठ्यानं नांगरलं शेत; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More