बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही”; शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा

रायगड | राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनोतून राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरवण्यात येणार आहे. मात्र या मुद्दयावरून आता वाद पेटलेला पहायला मिळत आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण रायगडावरील होळीच्या माळावर आम्ही हेलिकॉप्टर  उतरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त तीन ते सात डिसेंबर या कालावधीत रायगडावर नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्य़ात आली आहे. किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या आजुबाजूकडील परिसर हे तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रस्ता व नातेगाव ते पाचाड बाजुकडील रस्ता सुद्धा सुरक्षेच्या दृष्टकोनातून पर्यटकांकरीता बंद करण्यात येणार आहे.

रायगडावरील होळीच्या माळावर याआधी हॅलिपॅ़ड होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत असताना किंवा उड्डाण घेत असताना कचरा व धूळ उडायची. ही धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन बसायची. अवमानाचा प्रश्न निर्माण झाल्याने 1996 ला शिवप्रेमींनी उपोषण करून हे हॅलिपॅड काढून टाकण्यास सांगितले. 25 वर्षांनंतर हाच प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. अवमानाचा हा प्रश्न असल्यानं शिवप्रेमींकडून याला विरोध होत आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन्ही पदांवरील मान्यवरांनी भेट दिलेला रायगड हा एकमेव असा किल्ला आहे. या आधी 1980 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 व्या पुण्यतिथी दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दुर्गराज रायगडावर आल्या होत्या. 1985 साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे उद्घाटन करण्यासाठी माननीय राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते.

थोडक्यात बातम्या-

“माफी तर मागितली, पण प्रायश्चित्त कसं करणार?”

ऐकावं ते नवलच! ओमिक्रॉनबाधित पहिला रूग्ण फरार

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

“ममता मोदींच्या इन्फॉर्मर, त्या विरोधकांना फोडून कमकुवत करत आहेत’”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More