Maharashtra Kesari 2023 | शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

पुणे | पुण्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षेने पटकावली. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटात चीतपट केलं.

अतिशय थरार हा सामना ठरला. दोन्ही पैलवान एकमेकांना भारी पडत होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवराज राक्षेने महेंद्रला कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं.

खूप आनंद होतोय. आनंद शब्दांत सांगता येत नाहीय, अशी पहिली प्रतिक्रिया शिवराज राक्षे याने दिली. महाराष्ट्र केसरी’ च्या किताबा सह त्याने, मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस देण्यात आलं आहे.

10 जानेवारी  ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा झाली असून यात राज्यातील तब्बल 900 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

आज झालेल्या मॅटवरील कुस्तीत शिवराज राक्षे आणि माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. यात शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत 8-1 अशा गुण फरकाने विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More