भोपाळ | मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मध्य प्रदेशमध्ये सत्तापालट झालं आहे. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच आपलं पहिलं प्राधान्य कोरोना नियंत्रणाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजभवन येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते थेट वल्लभ भवन येथे पोहचले. तेथे त्यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
मध्य प्रदेशमध्ये सध्या कोरोनाने नुकतंच डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये त्यावर नियंत्रणासाठी प्रयत्न केलं जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”
“काही लोकांना गांभीर्य कळलेलं नाही, पोलिसांना कायदा हातात घ्यावा लागेल”
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ
कमांडो ऑपरेशन राबवून POK ताब्यात घ्यायची हीच वेळ आहे- अविनाश धर्माधिकारी
शिवभोजन थाळी पार्सल करून गोरगरीब जनतेला द्या; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
Comments are closed.