भोपाळ | जम्मू काश्मीरमधील कलम 370 मुद्द्यावरुन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना त्यांनी ‘गुन्हेगाराची’ उपमा दिली आहे.
जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर आगेकूच केली. तेव्हाच नेहरुंनी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळेच काश्मीरचा एक तृतीयांश भाग पाकिस्तानकडे आहे. याला पंडित नेहरु जबाबदार आहेत, असं शिवराजसिंह म्हणाले आहेत.
आणखी काही दिवस शस्त्रसंधीची घोषणा केली नसती तर संपूर्ण काश्मीर भारताचा भाग असता, असंही शिवराजसिंह म्हणाले आहेत.
दरम्यान, पंडित नेहरुंनी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू केले. एकाच देशात दोन चिन्ह, दोन संविधान आणि दोन पंतप्रधान कसे असू शकतात. हा देशावर अन्याय नाही तर अपराध आहे, असा आरोप शिवराजसिंह यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूरग्रस्त भागातील जनावरांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
-काँग्रेसला अध्यक्ष मिळेना; पुन्हा सोनिया गांधींची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
-अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी मानसी नाईकच्या डोळ्यात पाणी!
-…तर विरोधकांनी लक्षात ठेवावं, पंगा आमच्याशी आहे- चंद्रकांत पाटील
-“सरकार काही करो न करो, विश्वजीत कदम शेवटच्या श्वासापर्यंत जनतेला मदत करेन”
Comments are closed.