ना हार मैं, ना जीत मै… शिवराज सिंहांनी वाजपेयी अंदाजात पराभव स्वीकारला

नवी दिल्ली | मध्यप्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपचा पराभव मान्य केला आहे. मात्र ज्या शैलीत त्यांनी हा पराभव मान्य केला आहे, ते पाहून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण झाली आहे.

भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक मतं जरी मिळाली असली तरी बहुमत मात्र मिळालं नाही, त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996 साली केलेलं भाषण आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे. त्यावेळी, बहुमत न जमवू शकल्यानं अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत भाषण देतानाच आपल्या १३ दिवसांच्या सरकारचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, मध्यप्रदेशात भाजपला 109 जागा तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल