देश

…म्हणून मी या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय घेतला- शिवराज सिंह चौहान

भोपाळ | कोरोना लसींना मंजुरी देण्यात आल्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली आहे.

मध्य प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लस देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. राज्यात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय मी घेतला आहे, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

प्राधान्य देण्यात आलेल्या सर्व ग्रुप्सना प्रथम लस देण्यात येईल. नंतर माझा क्रमांक आला पाहिजे. राज्यातील लसीकरण सुनिश्चित केल्यावर कोरोनाची लस टोचून घेईन, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय.

दरम्यान,सुरुवातीला आरोग्य सेवक, कोरोना वर्कर, 50 वर्षांपेक्षा अधिक व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

…तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही- चंद्रकांत पाटील

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

“अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु”

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या