देश

पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या या नेत्याची टीका

Loading...

पणजी |   स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच गोवा मुक्तीस विलंब झाला, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. भाजप मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

भारत स्वातंत्र झाल्यानंतर देखील गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यातच राहिला. गोवा मुक्त करणे खरं तर केंद्र सरकारची जबाबदारी होती. मात्र तत्कालिन केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नाही. आणि त्यामुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला, असं चौहान म्हणाले.

पंडित नेहरूंनी जी निती गोव्याच्या बाबतीत वापरली तिच निती त्यांनी काश्मिरच्या बाबतीतदेखील वापरली. राजा हरिसिंग यांनी काश्मिर भारतात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर देखील काश्मिरला त्यांनी 370 कलमाअंतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मिर प्रश्न कायमचा लटकत ठेवला, असं चौहान म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसला जे 70 वर्षांत जमले नाही ते मोदींनी 75 दिवसांत करून दाखवले, असंही सांगायला चौहान विसरले नाहीत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-….तर एक दिवस भाजपचं काँग्रेस होईल- महादेव जानकर

-काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर!

-पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार; विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

-धक्कादायक!!! मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

-ही अभिनेत्री म्हणते… सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या