संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

भोपाळ | ‘हिम्मत असेल तर काँग्रेसने संघावर बंदी आणावी’ असं आव्हान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केलं आहे. नेहरुंच्या काँग्रेसला ते जमलं नाही आणि आताच्या काँग्रेसला तर ते कधीही शक्य नाही, असंही ते म्हणाले.

मध्य प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर संघाच्या शाखांवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद-प्रतिवाद सुरू आहेत. काँग्रेसने आपल्या वचननाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघ शाखेत जाण्यावर आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरातील संघ शाखांवर निर्बंध लावण्याचं आश्वासन दिलं आहे.

त्यामुळे या मुद्यावर शिवराज सिंह यांनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. संघ शाखामध्ये सरकारी कर्मचारी सहभागी होतील आणि त्यांना कोणी रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, कोणताही सरकारी कर्मचारी राजकीय संघटनेशी जोडू शकत नाही, असं काँग्रेस नेते जोतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे

-भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!