उमेदवार भलेही कुख्यात गुन्हेगार असू दे पण जिंकणारा असावा!

भोपाळ | मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसं तेथील राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर शक्य त्या मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेसने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा उचलून धरला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून शिवराजसिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे.

या व्हीडिओमध्ये कमलनाथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. उमेदवारावर भलेही चार-पाच गुन्हे दाखल असू दे, पण तो जिंकून येणारा हवा. शेवटी जिंकणं महत्वाचं, असं ते त्यात म्हणत आहेत.

जनता सुज्ञ आहे. कोणाला विजयी करायचं हे जनतेला चांगलंच माहित आहे, असं कमलनाथ यांच्या वक्तव्यावर टीका करताना शिवराजसिंह म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेसमोर असतं-अण्णा हजारे

-शिवसेना दुतोंडी सापासारखी, बोलते एक आणि करते एक- प्रकाश आंबेडकर

-मनसेचे विभागप्रमुख कर्ण बाळा दुनबळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

-अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल!

-वन खात्याचं नाव बदलून ‘शिकारी खाते’ ठेवा- आदित्य ठाकरे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या