देश

ज्योतिरादित्य शिंदेंना मारण्याचा प्रयत्न; शिवराजसिंह चौहान यांचा आरोप

नवी दिल्ली| राज्यसभा निवडणूकीचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी थांबवून दगडफेक केल्याचा आरोप भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावल्याचे समजत आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर दगडफेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे स्थनिक नेते राजेंद्र गुप्ता, श्यामला पोलिस चौकीत दाखल झाले होते.

शिंदे यांना सांयकाळी सात वाजता काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर काही अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस अधिकारी बी. पी. सिंह यांनी सांगितले आहे.

शिंदे यांच्या चालकाने गाडीवर दगडफेक होत असताना गाडी कशीबशी तेथून काढली, जर ज्योतिरादित्य शिंदेंवर दगडफेक होऊ तर मग सर्वसामान्यांचं काय असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेत असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतात 11 रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा

राष्ट्रवादी सोडल्यापासून उदयनराजेंच्या संपत्तीत इतकी घट!

महत्वाच्या बातम्या-

‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवा”

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या