बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“झारखंड निकालांचा आणि नागरिकत्व कायद्याचा संबंध नाही”

जयपूर | झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपच्या जागा गेल्यावेळेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. निकालाचे ट्रेंड्स कायम राहिल्यास भाजपची या राज्यातील सत्ताही जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

झारखंड निकालांचा आणि नागरिकत्व कायद्याचा संबंध नाही. झारखंडमधील निकाल म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्याची लिटमस टेस्ट नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातील निवडणूक ही तेथील मुद्द्यांवर लढवली जाते, असं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते जयपूरमध्ये बोलत होते.

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी सुरू झाली. या ठिकाणी भाजपची सत्ता होती. पण मतमोजणीचे ट्रेंड्स पाहता राज्यातील भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी सर्वाधिक जागांवर पुढे आहे.

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायदा आणि झारखंडमधील निवडणूक यांचा संबंध येत नाही. शेजारी देशांमध्ये ज्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळत होती. ज्यांच्यावर अत्याचार होत होते. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान म्हणून अवतरले आहेत, असं शिवराजसिंह चौहान  म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More