बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर बच्चू कडू जिवंत राहिले नसते आणि मी ट्रेकिंग कायमचं सोडलं असतं!

मुंबई | प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू त्यांच्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध आहेत. मात्र ते आज आपल्यात दिसले नसते कारण त्यांचा किल्ले भ्रमंतीचा छंद त्यांच्या अंगलट आला असता. या संदर्भातील बच्चूंच्या जीवनातील एक खास किस्सा त्यांचे मित्र आणि हिंदवी ‘परिवार’चे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितला आहे.

बच्चू कडू आणि आम्ही गेल्या 13वर्षांपासून अखंडितपणे सहभागी असतात. मात्र मला अजुनही आठवतो तो दिवस 8 जानेवारी 2012. आम्ही तोरणा गडावर लढायला सुरूवात केली. गोदरच आमच्या #Rescue_Teamने दोर बांधलेली होतीच ,त्याच्या साहाय्याने सर्वजण वर चढले. माचीजवळ समांतर सर्वजण चढाई करत होते.

आता बच्चु भाऊ ओलांडत असताना अचानक त्यांचा स्पोर्ट शूज स्लिप होऊन ते घसरले खाली हजारो फूट खोल दरी. माझ्यासहित सर्वांचे श्वास रोखल्या गेले. माझ्यासहित सर्वांचे श्वास रोखल्या गेले. सुदैवाने त्यांच्या हाताला डोंगरातला छोटासा दगड बुडत्याला काठीचा आधार ह्या वाक्प्रचार अर्थ त्यावेळी कळला. हातात आला,आणि खाली दरीत कोसळणे वाचले, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जर त्या दिवशी ,घसरत जाणाऱ्या बच्चूभाऊना तो छोटासा दगड धरायला सापडला नसता आणि भाऊ दरीत कोसळले असते तर जीवंतच राहिले नसते,आणि मी आयुष्यातून ट्रेकिंग कायमचं सोडलं असतं, असा खास किस्सा शिवरत्न शेटे यांनी सांगितला.

दरम्यान,  शिवरायांच्या अर्ध्या आयुष्याचा साक्षीदार आणि गडांचा राजा असलेल्या राजगड गडावरील मोहिम सर्वांनी आखली होती. आम्ही मात्र सर्वजण राजगड पायथ्याशी गुंजवणे या गावी जमलो चढाई करायला सुरुवात ही केली, पद्मावती माचीवर पोहोचलो, सर्वांचं रात्रीचे भोजनही झाले,अनेकजण येऊन म्हणू लागले की यावेळी बच्चूभाऊ कदाचित येणार नाहीत?, सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलं होतं, आणि बघतो तर काय ,बच्चूभाऊ दिसले. बच्चू भाऊ मुंबईवरून पुणे ते नसरापूरमार्गे गुंजवणेला येण्यास रात्रीचे 10 वाजले एका गावकऱ्यांला घेऊन मध्यरात्री 12:30ला राजगडावर पोहोचले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

‘लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्यांच्या अन्न-सुरक्षेची काळजी घ्या’; सोनियांचं मोदींना पत्र

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन

देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

अन्य देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली म्हणूनच भारत मोठ्या संकटापासून वाचला- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More