बीडमध्ये मेटेंना पंकजा मुडेंशी पंगा नडला; शिवसंग्रामचे दोन ZP सदस्य भाजपात

बीड |  कार्यकर्ते नाराज असल्याने पंकजा मुडेंसोबत काम करणार नाही, असं म्हणून मेटेंना 8 दिवसही उलटत नाहीत तोच शिवसंग्रामच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

जिल्हा परिषदेतील गटनेते अशोक लोढा आणि सदस्य विजयकांत मुंडे अशी या सदस्यांची नावे असून पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्याशी जवळीक साधल्याने मेटे नाराज झाले होते. राष्ट्रवादीच्या क्षीरसागरांनीच मेटेंचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.

मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाचे बीड जिल्हा परिषदेत 3 सदस्य होते. यातल्या 2 सदस्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’

चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’

बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….