बीड | सर्व शासकीय कार्यालयांना शिवजयंती सकाळी साजरी करणे बंधनकारक केलेले असताना बीड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती साजरी केली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसंग्रामच्या वतीने त्या कार्यालयात जाऊन शिवजयंती साजरी केल्यानंतर संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्याने शिपायांवर दबाव आणून पदाधिकार्त्यांविरुद्ध शिवजयंती साजरी केली म्हणून तक्रार दाखल केली होती.
२० फेब्रुवारी रोजी शिवसंग्राम सामाजिक न्याय विभागाकडून या प्रकाराचा दंडाला काळ्या फिती लावून निषेध करत सदर शिवद्रोही अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. फक्त शिवजयंतीचा नव्हे तर या पशुसंवर्धन कार्यालयात इतर कोणतीही जयंती साजरी केली जात नसल्याचे समोर आले आहे. शिवसंग्रामच्या वतीने परवाच याबाबतीत प्रसिद्धीपत्रक काढले होते.
सर्व शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्याबाबत जिल्हा परिषदेने दि १८ फेब्रुवारी २०२० रोजी नोटीस काढून सर्वांना ताकीद देखील दिली असताना नेहमीप्रमाणे पशुसंवर्धन कार्यालयाने याकडे का कानाडोळा केला? जर त्या कार्यालयात जयंती साजरी करायची नव्हती तर इतर ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणाबाबत तशी सूचना कार्यालयात चिटकवणे अन उपस्थित राहणे आवश्यक असल्याची नोटीस काढायला हवी होती. मात्र या कार्यलयात असा कोणताही प्रकार दिसून आला नसल्याने शिवसंग्रामकडून येथे गांधीगिरी पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
या ठिकाणी कार्यालय सकाळपासूनच बंद होते. येथील शिपायास संपर्क करून कार्यालय सुरु करत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांनी सदर शिवजयंती न करणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष असणाऱ्या या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी दंडाला काळ्या फिती लावून शिवद्रोही पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा निषेध देखील शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सुहास पाटील, सचिन कोटुळे, राजेंद्र आमटे, कुतुबभाई, रायचंद कापसे, बळीराम थापडे, नंदकिशोर पिंगळे, अझर भाई, सीताराम घुमरे, योगेश जाधव, संदीप येवले, अखिलभाई, विष्णू डोईफोडे, संकेत गुजर, ज्ञानेश्वर डोरले, जाकेर हुसेन, शेषेराव तांबे, अक्षय माने, सौरभ तांबे, सुनील धायजे, विजय डोके आदींसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ट्रेंडिंग बातम्या-
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींची घेणार भेट; चर्चांना उधाण
आम्ही १५ कोटी मात्र १०० कोटींना भारी; MIMच्या नेत्यानं गरळ ओकली
महत्वाच्या बातम्या-
ओवैंसींसमोरच तरुणीच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!
मी तसं वक्तव्यच केलं नाही; इंदोरीकर महाराजांची कोलांटीउडी
दगडाला उत्तर दगडानं, तलवारीला उत्तर तलवारीनं; वारिस पठाणांना ‘मनसे’ इशारा
Comments are closed.