बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

मुंबई | एका मुस्लिम देशातील मंदिरात हिंदुस्थानी पंतप्रधानाने अधिकृतपणे दर्शनासाठी जाणं हे मोदीप्रेमींना नक्कीच रोमांचकारी वाटू शकते. राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील. याबद्दल त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच, असा टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर ‘बांगलादेशी’ घुसले आहेत. त्या व्होट बँकेवर अनेक मतदारसंघांचे निकाल बदलणार आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱ्यांची नातीगोती पश्चिम बंगालात मोठय़ा प्रमाणावर आहेत. इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असे शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आले नाही, असंही अग्रलेखात म्हटलंय.

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ आणि पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, असा टोला शिवसेनेनं नरेंद्र मोदींना लगावला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, असा सल्ला शिवसेनेनं मोदींना अग्रलेखातून दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”

शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस

नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदायाची मिरवणूक, पोलिसांवर केला हल्ला

विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More