शिवसेना-भाजप युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सामील होणार नाही!

अकलूज | आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष त्यात सहभागी होणार नाही, असं महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत जे ठरवतात तीच ठाकरेंची भूमिका असते. भाजप-शिवसेनेच्या युतीत आम्ही कदापि सहभागी होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. 

पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाची पायाभरणी झाली असताना, पुन्हा पायाभरणी कशासाठी. सरकार स्मारकाबाबत वेळकाढूपणा करीत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, आरक्षणाबाबत मराठ्यांचा अंत पाहू नका, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी जानेवारीत

-विराट कोहली तू हे करुन दाखव; रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरचं चॅलेंज

-पुणेकरांना महापालिकेचा मोठा दणका; आजपासून पाण्यासंदर्भात मोठा निर्णय

-फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये मेगा भरती; 1 लाख 20 हजार नोकऱ्या?

-खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन; टीव्ही चॅनेलच्या संपादकाला अटक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या