बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई । दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. यावर्षी मात्र ही परंपरा खंडीत होते की काय? असा प्रश्न निर्माण होतोय.

येत्या 5 ऑक्टोबरला दसरा. यादिवशी दसरा मेळावा कुणी घ्यायचा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं यासाठी शिंदे गटाकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. याचसोबत महापालिका निवडणूका असल्याने या दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाने महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र अजुनतरी कोणतंही उत्तर पालिकेकडून आलं नाहीये. त्यामुळे यंदा शिवाजीपार्क कोणाच्या दसरा मेळाव्याने गाजणार याकडे सळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More