Top News राजकारण

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

मुंबई | आमदार आशिष शेलार यांनी एका सोहळ्यात मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. यावरून परिवहनमंत्री अनिल परब यांनी शेलारांना टोला लगावलाय.

अनिल परब म्हणाले, “आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये. सध्या भाजपला सत्तेची स्वप्न पडतायत. याच स्वप्नांमध्ये त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा.”

दरम्यान, राज्यपालनियुक्त जागांबाबत 15 राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असंही अनिल परब यांनी सांगितलंय.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं, असं विधान आशिष शेलार यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या