Top News राजकारण

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनंतर आता शिवसेनेने देखील मिशन मुंबई हाती घेतलंय. या निवडणूकीत भाजपा-मनसे संभाव्य युतीविषयी बोलताना शिवसेनेने मनसेवर सडकून टीका केली आहे.

शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले, “मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही याबाबत कल्पना नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही.”

“कोणाची तरी सुपारी मनसेला घ्यावीच लागेल. कारण मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे, आतापर्यंत मनसेने अनेक पक्षांची सुपारी घेतली असल्याचा आरोप,” देखील अनिल परब यांनी केला.

परब पुढे म्हणाले, “लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून भाजपा नेत्यांना उघडंनागडं केलं. त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल.”

महत्वाच्या बातम्या-

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

असंच काम करा, म्हणजे आम्हाला बोलावं लागणार नाही; मनसेचा शिवसेनेला टोला

राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही, मात्र….- जयंत पाटील

शरद पवार हे 4 खासदारांचे लोकनेते; गोपीचंद पडळकर यांनी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या