बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बापू, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या”

पंढरपूर | पंढरपूरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले (Ganesh Ingole) यांनी सोशल मीडियातून शहाजी बापू पाटलांना हे प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय.

बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा…काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके. आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या, असा सल्ला पदाधिकाऱ्याने दिलाय.

आमदार शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर हा त्यांचा डायलॉग फेमस झाला. अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या. आमदार असून निधी कमी पडतोय, खूप गरीबीत राहतोय, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यातच किती दिवस झाले, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच पंढरपूरच्या युवासेना नेत्यानं त्यांना आधी ती साडी घेऊन या असा सल्ला दिलाय.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More