सांगली : युतीची 29 सप्टेंबरला घटस्थापनेला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार, असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते म्हणाले आहेत.
शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास दिवाकर रावते यांनी बोलून दाखवला आहे. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे.
आपण शिवसेना पक्षातील आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दक्ष असयला हवं. 11 च्या मेळाव्याला तुम्ही 12 वाजता उपस्थित राहिलात. मेळाव्याला उशिरा उपस्थित राहून मागे बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार घाला, असंही रावते म्हणाले.
महत्वाच्य बातम्या-
पुण्यात पावसाचं थैमान; दुचाकीसह महिला वाहून गेली – https://t.co/jGC607c5tQ #म
— थोडक्यात (@thodkyaat) September 26, 2019
…तर पवारांचं नाव कसं आलं; अण्णांचं पवारांना क्लीन चीट – https://t.co/RelZuke7HA @AnnaHazare1938 @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) September 26, 2019
“राष्ट्रवादीने मला फोडलं नाही तर भाजपनेच मला पक्षातून काढून टाकलं”https://t.co/yO48Y4X3Tl @dhananjay_munde @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) September 26, 2019
Comments are closed.