बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व विजयी खासदार घेऊन अयोध्येला जाणार आहेत. याच प्रकरणी काँग्रेसने त्यांना चांगलंच लक्ष्य केलंय.

लोकसभेपुर्वी, पहले मंदिर फिर सरकार… अन आता पुन्हा अयोध्यावारी… ही तर सारी विधानसभेच्या जास्तीच्या वाट्याची तयारी, असं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

दुसरीकडे उद्धव ठाकरे दहा वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणं अशक्यच आहे, असा टोला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या टीकेला आणि मित्रपक्ष असलेल्या आठवलेंच्या घरच्या आहेराला शिवसेना काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर अशक्यच- रामदास आठवले

-अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलं ओपन चँलेज

अशोक चव्हाण यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; काँग्रेसच्या गोटात खळबळ

-अशोक चव्हाणांचा पराभव पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी; घेतला हा मोठा निर्णय

-काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांची शिवसेनेवर सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More