बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणं गाजली असताना शुक्रवारपासून मुबंईत राजकीय नाट्य रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) राणा दांपत्याच्या भेटीला गेले असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाल्याने भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. तर सोमय्यांनीच शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप करत शिवसेना (Shivsena) नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप शिवसेना नेते व माजी महापौर विश्वनाथ महाडेश्र्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी केला आहे. याप्रकरणी महाडेश्र्वर यांनी किरीट सोमय्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला नसल्याचंही महाडेश्र्वर म्हणाले आहेत.

दरम्यान, माझ्यावर हल्ला होणार असल्याचं सोमय्यांनी पोलिसांना कळवलं होतं. त्यामुळे आता सोमय्यांवरील हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर माझी हत्या करण्यासाठी माझ्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे”

‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच

“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी”; नवनीत राणांची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More