मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

मुंबई | सत्तेत एकत्र असूनही विरोधकांपेक्षा जास्त विखारी टीका एकमेकांवर करणाऱ्या शिवसेना-भाजपचं मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत मात्र सूत जुळलंय. शिवसेनेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीय.

भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे वॉर्ड क्रमांक 21 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. भाजपने त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना उमेदवारी दिलीय. शिवसेनेनं भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी मंत्री विनोद तावडे आणि भाई गिरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 

दरम्यान, गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, त्यामुळे शिवसेनेनं बिनशर्त पाठिंबा दिल्याचं कळतंय.