सूर्यावर थुंकू नका, नाहीतर थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल!

मुंबई | पीएनबी बँकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नीरव मोदी प्रकरणी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सोशल मीडियावरही हा कलगीतुरा पहायला मिळतोय. 

पैसे बॅंक मे रखो तो
नीरव मोदी का डर..
घर मे रखो तो नरेंद्र मोदी का.., असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. 

दरम्यान, हे ट्विट भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना चांगलंच झोबलं. उगाच “यमका” साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!!, असं शेलार यांनी म्हटलंय.