बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची डरकाळी; ‘मुख्यमंत्री आमचाच होणार’!

नाशिक | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र मुख्यमंत्री कुणाचा यावरून भाजप शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं दिसत आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोस्टरवर वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले असून त्यावर ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजप युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार’, असं लिहिलं आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असून आता या वादाचंं रूपांतर पोस्टर वॉरमध्ये झालं असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रामदेव बाबांच्या पतंजलीवर राज्य सरकार मेहेरबान; 400 एकर जमिनीला चार दिवसात मंजूरी

-धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीपूर्वी आनंदाची बातमी

-“हिंदी भाषेमुळे संसदेतल्या चर्चांची पातळी खालावली”

-“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत, हीच कार्यकर्त्यांची इच्छा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More