अवनीला मारल्याप्रकरणी कॅबिनेट बैठकीत ‘शिवसेनेचे वाघ’ संतापले

मुंबई | अवनी वाघिणीच्या हत्या प्रकरणाबद्दल शिवसेनेचे मंत्री आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आक्रमक झाले होते. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरलं.

रामदास कदम यांनी मांडलेल्या मुद्द्याला इतर सेना मंत्र्यांनी पाठिंबा दिला होता, अवनीला मारल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अवनीच्या हत्येची चौकशी करण्यासाठी दोन समित्या निर्माण केल्याचं बैठकीत सांगण्यात आलं.

दरम्यान, आजच्या कॅबिनेट बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उशिरा आले, तोपर्यंत सेनेचे मंत्री आक्रमक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल