बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक, सुशांतच्या गळफासाला 8 तास होत नाही तोपर्यंतच मुंबईत दुसरी आत्महत्या…!

मुंबई  |  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यनेनंतर सगळ्यांनाच जोरदार धक्का बसला. त्याच्या गळफासाला उणीपुरे 8 तास देखील होत नाहीत तोपर्यंतच इकडे मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या एका मुलाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.

शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने घरातल्या सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक श्रीकांत शेट्ये असं या नगरसेवकाच्या मुलाचं नाव आहे. अभिषेकने अवघ्या 25 व्या वर्षी हे हे जग सोडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईतल्या चेंबूरमधल्या सुमन नगर प्रभाग क्रमांक 155 चे शेट्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत. याच परिसरात त्यांचं घर आहे. तसंच तिथेच ते वास्तव्याला होते. राहत्या घरीच अभिषेकने गळफास घेतला आहे.

रविवारी तो अन् त्याचा भाऊ घरात होते. ते दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपले होते.अभिषेत बराच वेळ उठला नाही असा विचार करून त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला मात्र तोपर्यंत अभिषेकने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला होता. यासंबंधीचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

‘…अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है’; सुशांतच्या आत्महत्येनंतर संजय राऊत हळहळले

महत्वाच्या बातम्या-

मुंबई लोकल आजपासून पुन्हा सुरू… फक्त ‘यांनाच’ मिळणार प्रवेश

राज्यात आज 3390 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

सुशांतसिंग राजपूतनं लिहून ठेवली होती ‘ही’ 50 स्वप्नं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More