लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू; उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणूक निकालांंमुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय करायचे ते आम्ही ठरवू, अशा आक्रमक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानची जनता सुज्ञ आहे. तेथील जनतेने कोणत्याही दहशतीला आणि लोभाला बळी न पडता मतदान केले. त्यांना हवे ते त्यांनी केले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून हल्ला चढवला.

महत्वाच्या बातम्या –

-स्वतःला वाचवण्यासाठी मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला फसवले- काँग्रेस

-शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!

-कोण होणार अहमदनगरचा महापौर?; शिवसेनेचे रामदास कदम ठरवणार…

-लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

-काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद